Ad will apear here
Next
के. जे. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना ‘झेन्सार टेक्नॉलॉजी’तर्फे पुरस्कार
के. जे. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना झेन्सार टेक्नॉलॉजीतर्फे पुरस्कार.
पुणे : के. जे. अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रणी असलेल्या ‘झेन्सार टेक्नॉलॉजी’च्या वतीने विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले. सॉफ्टवेअर इंजिनीअर्स म्हणून वेगवेगळ्या प्रकल्पांमध्ये छाप पाडलेल्या विद्यार्थ्यांना दर वर्षी ‘झेन्सार’तर्फे पुरस्कार दिले जातात. यंदा के. जे. अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मुस्तफा बादशाह, गुरप्रीत गिल, सानिया डिसूझा या विद्यार्थ्यांना ‘बेस्ट परफॉर्मर ऑफ द टीम’ पुरस्कार देण्यात आला.

अमिद पटेल याला ‘बेस्ट परफॉर्मर ऑफ दी टीम’ आणि ‘बेस्ट परफॉर्मर ऑफ दी इयर’ पुरस्कार देण्यात आला. मोहसीन नदाफ या विद्यार्थ्याला कंपनीतर्फे जोहान्सबर्ग येथे जाण्याची संधी मिळाली. के. जे. महाविद्यालयाचे ८५पेक्षा अधिक विद्यार्थी ‘झेन्सार’बरोबर काम करत आहेत. विद्यार्थ्यांची रोजगारक्षमता वाढविण्यासाठी सॉफ्ट स्किल प्रशिक्षण, ॲप्टिट्यूड चाचणी घेतली जाते. ट्रेनिंग प्लेसमेंट विभाग आणि झेन्सार यांच्यात सामंजस्य करार झाला असून, १०० मुलांचे २०० तासांचे प्रशिक्षण घेतले जाते.

ऑगस्ट महिन्यात प्लेसमेंट होणाऱ्या विद्यार्थ्यांनी सातत्याने चांगले काम करून पुरस्कार मिळवावेत, असे आवाहन प्राचार्य डॉ. सुहास खोत यांनी केले. संस्थेचे अध्यक्ष कल्याण जाधव, खजिनदार विनोद जाधव, व्यवस्थापकीय संचालिका हर्षदा जाधव, कार्यकारी संचालक डॉ. हेमंत अभ्यंकर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/FZYLBE
Similar Posts
नटवर्य श्रीराम गोजमगुंडे रंगकर्मी पुरस्कार सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे प्रदान पिंपरी चिंचवड (पुणे) : गडकिल्ले संवर्धनासाठी महाराष्ट्रात अग्रेसर असणाऱ्या सह्याद्री प्रतिष्ठान संस्थेतर्फे ‘गौरव रंगकर्मी समिधांचा’ कार्यक्रमांतर्गत मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांचा नटवर्य श्रीराम गोजमगुंडे यांच्या नावाने पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. चिंचवडमधील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात
नेल्डा फाउंडेशनतर्फे पुरस्कार पुणे : नेल्डा फाउंडेशनच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त ‘नेल्डा अभिवादन २०१७’ हा सोहळा नुकताच पार पडला. या कार्यक्रमाचे आयोजन पुण्यातील जवाहरलाल नेहरू मेमोरियल हॉलमध्ये करण्यात आले होते. पुणे शहरात व परिसरामध्ये पर्यावरण संवर्धनासाठी उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्ती व स्वयंसेवी संस्थांना त्यांच्या कामाची
‘स्टुडिओ मार्स’ला इनोव्हेशन पुरस्कार पुणे : येथील स्टुडिओ मार्स या डिझायनिंग क्षेत्रात कार्यरत असलेल्या संस्थेचा नुकत्याच मुंबईत झालेल्या पाचव्या क्युरिअस क्रिएटिव्ह पुरस्कार सोहळ्यात ‘इनोव्हेशन’ (InOOHvation) पुरस्काराने सन्मान करण्यात आला. कायनेटिकच्या सहकार्याने ‘इनोव्हेशन’ या जाहिरात निर्मिती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कायनेटिक अॅडव्हर्टायझिंग इंडिया प्रा
अवादा पॉवरच्या सामाजिक उपक्रमांचा गौरव पुणे : भारतातील अग्रगण्य स्वच्छ उर्जा कंपनी, अवादा पॉवर प्रा. लि., देशभरातील वंचित समुदायांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करत आहे. स्त्रियांमध्ये कौशल्य निर्माण, ग्रामीण विद्युतीकरण, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि आरोग्यसेवेचा प्रसार करून महिलांचे सशक्तीकरण करण्याच्या दिशेने कंपनीने अनेक कार्यक्रम सुरू केले आहेत

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language